Friday, August 5, 2011

पावसाच्या अंगणात



पावसाच्या अंगणात एक शुभ्र ढग आला,
छप्पाक-पिच्चाक करून धूम बागडू लागला.
पॉलिथीनची टोपी केली, कागदाच्या होड्या,
चोहीकडे पाणी उडवत केल्या लाख खोड्या.

सप्तरंगी छत्री सोबत होते लाल गमबूट,
शंख-शिंपल्यांनी भरली त्याने इवलीशी मूठ.
हुंदडून बागडून मनसोक्त शांत मग तो बसला,
निघताना सारे अंग भिजवून, बूट पण पाण्याने भरला.

उंच उडून दूर कुठले कोरडे गाव एक गाठले,
क्षणात आनंदी भावाने त्याने सारे पाणी ओतले.
तप्त धरेचा उश्वास पाहून तोही तृप्त झाला,
पावसाच्या अंगणात एक शुभ्र ढग परत आला.
~

Wednesday, May 11, 2011

अर्धवट

अंग सुन्न होऊन जातं. थंड! श्वास बंद होतो. कमी होतो. हात पांघरुण होऊन एकमेकांना घट्ट कवटाळूण घेतात. हाता-छातीवरचे लव उभे राहतात. कोंदटल्यासारखं वाटतं. खिडकी उघडून वारा आत येतो. थोडं बरं वाटतं. विचार बंद होत नाहीत. डोकं शांत होत नाही. मनाला त्याची खिडकी सापडत नाही.

डोळे घट्ट बंद करुन पलंगावर बसतो. मागे सरकून भिंतीला टेकतो. विचार अजूनही भटकते. त्यांना त्यांचा आधार सापडत नाही.

हळूच चादर अंगावर घेऊन शेजारच्या उशीवर डोकं ठेवतो. थंडी कमी होते. उब थोडासा आराम देते. ओल्या पापण्या उघडतो. दात घट्ट बंद. डोळे पाण्याने भरतात. बंद केले तर अश्रू वाहतील म्हणून उगाच त्यांना साठवून ठेवतो.
...
...
...
...
...
...

"मित्र नेहमीसाठी राहणार नाहीत."






जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू