पॉलिथीनची टोपी केली, कागदाच्या होड्या,
चोहीकडे पाणी उडवत केल्या लाख खोड्या.
सप्तरंगी छत्री सोबत होते लाल गमबूट,
शंख-शिंपल्यांनी भरली त्याने इवलीशी मूठ.
हुंदडून बागडून मनसोक्त शांत मग तो बसला,
निघताना सारे अंग भिजवून, बूट पण पाण्याने भरला.
उंच उडून दूर कुठले कोरडे गाव एक गाठले,
क्षणात आनंदी भावाने त्याने सारे पाणी ओतले.
तप्त धरेचा उश्वास पाहून तोही तृप्त झाला,
पावसाच्या अंगणात एक शुभ्र ढग परत आला.
~